Subscribe: तेंडूची पाने
http://khodsal.blogspot.com/feeds/posts/default?alt=rss
Added By: Feedage Forager Feedage Grade B rated
Language: Marathi
Tags:
Rate this Feed
Rate this feedRate this feedRate this feedRate this feedRate this feed
Rate this feed 1 starRate this feed 2 starRate this feed 3 starRate this feed 4 starRate this feed 5 star

Comments (0)

Feed Details and Statistics Feed Statistics
Preview: तेंडूची पाने

तेंडूची पानेप्रतिभावंत कवी-शायरांना खोडसाळाचे विडंबनरूपी दंडवतLast Build Date: Fri, 03 Oct 2014 06:10:17 +0000

 वैधानिक इशारा

Mon, 02 Jan 2017 07:32:00 +0000

(image)
उजवीकडे 'सुभाषित सरिते'त दिसणारी इंग्रजी वाक्यं मी, म्हणजे खोडसाळाने, लिहिलेली नसून मला आवडलेली प्रसिद्ध quotations आहेत. एका वाचिकेचा गैरसमज झाल्यामुळे हे स्पष्टीकरण देत आहे.


प्रस्तावना

Fri, 01 Jan 2016 07:10:00 +0000

      मराठी भाषेला वाहिलेल्या संकेतस्थळांवर व आपापल्या जालनिश्यांवर अनेक प्रतिभावान हौशी कवी आपल्या रचना सादर करतात. त्या वाचून आपल्याला असे काही लिहिता येत नाही याचा मला खूप राग यायचा. सांगू नका कोणाला, पण माझी अवस्था ते काय असूयाग्रस्त की मत्सरग्रस्त म्हणतात ना तशी व्हायची. मग ठरवलं - नाही ना आपल्याला असे काही छान छान, नवनवीन कल्पनांनी नटलेले, साहित्यिक मूल्यांनी ओतप्रोत, इ. इ. लिहायला जमत, मग ठीक आहे. जे लिहितात त्यांची विडंबनात्मक टर उडवायची. कोल्ह्याला द्राक्षं आंबट, दुसरं काय. परत विडंबन करणे तुलनेने बरेच सोपे, खासकरून छंदबद्ध कविता वा गज़लांचे. तयार जमीन, तयार यमकें, रेडीमेड कवाफ़ी. आपण फक्त ओळी जराशा उलटसुलट केल्या की झाले विडंबन तयार. वाचणाऱ्यांनाही गंभीर रचनांचे अर्थ लावत बसण्यापेक्षा 'हसा आणि विसरून जा' छाप विडंबने वाचणे सोयीस्कर वाटते. त्यामुळे आमच्यासारख्यांची चलती असते. कोणी नाक मुरडलेच तर कानाच्या पाळ्या धरून आचार्य अत्र्यांच्या ' झेंडूची फुले' चा वारसा सांगावा. वर अत्यंत आदराने (नाटकं करायला आपलं काय जातय) ' क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्प विषयामति: ' वगैरे वाक्यं टाकावी. एकाच वेळी आपला विनम्रपणा आणि सु'संस्कृत'पणा दाखवण्याची संधी का सोडा? (संस्कृतातील ओ की ठो काही येत नसले तरी गाठीशी अशी दोन-चार वाक्य पाठ करून ठेवली आहेत मी. भाव मारण्याच्या कामी येतात.) अशी काही विडंबने इथे देण्याचा मानस आहे. खरे तर 'टाकणार आहे' लिहिणार होतो पण 'देण्याचा मानस आहे' कसे भारदस्त वाटते, नाही? मूळ रचनांचा दुवाही देईन. विडंबन आवडो न आवडो, वाचकहो, त्या मूळ रचना जरूर वाचा ही मात्र खोडसाळाची कळकळीची विनंती आहे. त्या प्रतिभावंतांची थट्टा करण्याच्या माझ्या पापाचे यामुळे थोडे तरी परिमार्जन होईल.


ता.क. ह्या नोंदीची तारीख बघून चक्रावून जाऊ नका. ही प्रस्तावनास्वरूपी नोंद ब्लॉगच्या सुरुवातीसच रहावी म्हणून भविष्यकालीन तारीख घातली आहे.रशियन साहित्य व संस्कृतीचा आरंभ : 'प्राथमिक शाळेचा वृत्तान्त' आणि राजपुत्र व्लादिमिर

Thu, 19 Dec 2013 10:12:00 +0000

ऍलिस चुडोलिखित "ऍन्ड क्वाएट फ्लोझ द वॉड्का, ऑर व्हेन पुश्किन कम्ज टु शोव" ह्या पुस्तकातील “बिगिनिंग्ज - द प्रायमरी स्कूल क्रॉनिकल ऍन्ड प्रिन्स व्लादिमिर” ह्या पहिल्या प्रकरणाचा स्वैर अनुवाद रशियन साहित्याचा सर्वात प्राचीन उपलब्ध नमुना आहे एक खापरीचा तुकडा. त्यावर "मस्टर्ड" हा शब्द लिहिलेला आहे. रशियन साहित्याची सुरुवात प्रभावशाली नव्हती असे म्हणणार्‍यांना हे खोटे पाडते. मस्टर्डोव, क्युमिन, पेप्परिन, व सॉल्टिकोव-शेड्रिन ह्यांच्या महान, “मसालेदार" कादंबर्‍यांचा उगम ह्यातून झाला. मध्ययुगात फेनु द ग्रीकच्या धर्मशास्त्राची प्रेरणासुद्धा हीच. ह्या मस्टर्ड प्रकारापासून रशियन लिखाणाची वर्गवारी मसाल्यानुसार केली जाते. नामवंत स्लॅविक तज्ज्ञ वि. वि. वायनोपियानोव ह्यांच्या मते रशियन व्याजोक्ति पेप्पर युगाच्या सुरुवातीस उदयास आली, तर धर्मशास्त्र गार्लिकियाहून आयात केले गेले. “माती" व "शेण" असे ज्यावर लिहिले होते त्या मडक्यांमधून वास्तववाद जन्माला आला, आणि ज्यावर "वॉड्का" असे लिहिले होते त्यातून ह्या परंपरेतील सर्वात शक्तिमान चळवळ, मद्यवाद, उपजली. होमरची निषेधाज्ञा शिरसावंद्य मानून रशियन साहित्य मध्य युगासोबत मधूनच सुरू झाले. त्यामुळे ते कायम आपल्या उगमाच्या शोधात राहिले आहे. "प्राथमिक शाळेचा वृत्तान्त" हे रशियन साहित्याच्या अगदी सुरुवातीच्या काळातील पुस्तकांपैकी एक. (“माध्यमिक शाळेचा वृत्तान्त" हा त्याचा पुढला भाग महा विरेचनात हरवला.)१ आपल्या देशात नॉर्मन नावाचे परदेशी प्रथम येऊन वसले असे रशियन विद्यार्थी प्राथमिक शाळेत शिकतात. त्या परदेशियांचे आडनाव मात्र गुलदस्त्यात राहिले. एकच एक नाव धारण करण्याचा नॉर्मनांना लवकरच कंटाळा आला, व म्हणून रशियाच्या भावी राजपुत्रांची व राजकन्यांची नावे ऑल्गा, ऑलेग, आ[...]ग्रहासारखा नर तो फिरतो, ती तार्‍यागत दुस्तर असते!

Fri, 11 Oct 2013 16:26:00 +0000

प्रेरणास्रोतः ग्रहासारखा जो तो फिरतो, प्रत्येकाला घरघर असते!

हझल
ख्याती: जालावर्ती
कष्टपूर्वक विडंबनांची ख्याती
मात्राः ४-२-० => कडू. (image)  ( लागू पडली तर पडली)

ग्रहासारखा नर तो फिरतो, ती तार्‍यागत दुस्तर असते!
नार सरळ कोणतीच नसते, पटवायाला खडतर असते!!

मनी पाहिली, मनी घेतली मापे मादक मदालसेची;
कधी कधी मन शिंपी असते, कधी कधी मन अस्तर असते!

प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक नटीचा फोटो असतो;
जीएफ, पत्नी, आई, मुलगी, सारे सारे वरवर असते!

आई म्हणजे रट्ट्यांचा तो एक अनावर मारा असतो!
तोंडाचा असतो पट्टा अन्‌ जिव्हा म्हणजे कातर असते!!

रोजच येते अम्हा प्रचीती, मृदु चर्येच्या रौद्र रूपाची;
असो कितीही शूरवीर पण, घरात अमुची थरथर असते! 
कधी मी एक पेग्‌ प्यालो, कधी मी झोकल्या धारा!

Sat, 17 Nov 2012 01:09:00 +0000

प्रोफेसरांच्या (प्रा. सतीश देवपूरकर) बहुप्रसव व प्रतिभाशाली लेखणीतून झरलेल्या "कधी मी आगही प्यालो, कधी मी झोकला वारा!" ह्या गझलेने प्रेरित होऊन आम्ही केलेले हे पांढऱ्यावर काळे. प्रोफेसर, तुमच्याच शब्दांत सांगायचे तर,
"छान आहे तुझी गझल! आवडली.
फक्त अभिव्यक्ती थोडी अजून प्रभावी हवी होती.

आम्ही तुझी गझल अशी वाचून पाहिली......"

कधी मी एक पेग्‌ प्यालो, कधी मी झोकल्या धारा!
कधी केलाय मी शिमगा, कधी केलाय पोबारा!

गळाले नाक चाफ्यासे तिचे सर्दीमुळे ऐसे
रुमालावर तिच्या वाहून तो सुकलाय लिप्तारा

तिचे ते ओठ सुजलेले, जणू बोटॉक्स केलेले!
कसे चुंबायचे त्यांना, तिच्या दातांसही तारा!

फिकिर नाही, जरी माझी निघाली धिंडही येथे;  
जगाला लाभलो शायर, करिन हुकमी गझलमारा

दिल्या गझला किती त्यांना? कुठे मी मोजतो आहे?
मला पाहून केला वाचकांनी आज पोबारा

"मलाही" आकळेना का "स्वत:ची" आणि मग "माझी"
दिसे हा शेर 'खोड्या'ला द्विरुक्तीचाच डोलारा!


.....ना(ध्यापक) खोडसाळ
पद्यार्कचित्रण व निर्विष चिमटे विभाग,
रोजच्या खोड्या महाविद्यालय,
मु. पो. भादवि ४२०,
मराठी आंतरजालकाव्यलेखनातून भरघोस कमाई कशी करावी

Sat, 04 Aug 2012 16:41:00 +0000

काव्यलेखनातूनभरघोस कमाईकशी करावी: एकसहा-सूत्रीयोजनामायकललुईस ह्यानेजुलै २००५च्यापोएट्री मासिकातलिहिलेल्या, वनंतर पोएट्रीफाउन्डेशनह्या संकेतस्थळावरप्रकाशितकेलेल्याऔपरोधिकलेखाचाअनुवाद.१) सकारात्मकविचारकरा. रडगाणीगाणारी माणसेकोणालाहीआवडत नाहीत. अन्‌कवींचा भरकायम नकारात्मकगोष्टींवरअसतो. नुकतेचकोणीतरी मलाह्याचे एकउत्तम उदाहरणदाखवले. कवीचेनाव आहेविलियम कार्लॊसविलियम्स:It is difficultto get the news from poems,yet men die miserably every dayfor lackof what is found there. मलाविलियमविलियम्सवरउगाच टीकाकरायची नाहीआहे. निदानत्याच्याडोळ्यांसमोरसर्व चित्रस्पष्ट तरीआहे: अमेरिकीलोकांनावाचायला काहीतरी कारणलागते. एकदाते सापडलेकी प्रश्नमिटला! इतरकोणत्याहीदेशातील वाचकपुस्तकांतूनमहत्त्वाचीमाहितीशोधण्यासाठीएवढी मेहनतकरत नाहीत. आणिहेही खरेआहे कीत्यांनाबातम्यावाचायलाआवडतात. पणइथे विलियम्सनेदोन मोठ्याचुका केलेल्याआहेत: १) अमेरिकीमाणसांनासुरवातीलाचपुढचे सर्वकिती अवघडअसणार आहेहे सांगीतलेलेआवडत नाही; आणि२) मृत्यूलाखप नाही. माझ्यावरविश्वासठेवा. कसेमरावे ह्याचेज्ञान अमेरिकीमाणसांनानको असते. त्यांनावजन कसेकमी करावे, श्रीमंतकसे व्हावे, शिश्नोत्थापनकसे टिकवावेह्याची माहितीहवी! सदोषउत्थापनावरकाव्य केलेततर तुम्हालाबिले भरणेसहज परवडूलागेल. इतकापैसा कमवालकी तुम्हालातुमच्यामृत्यूचीपर्वा उरणारनाही. २) तुमचीनवी सकारात्मकवृत्ती तुमच्यागिर्‍हाईकांनादिसू द्या. गिर्‍हाईकहा तुमचामित्र आहे. तुमचीनेहमीचीप्रातिनिधिककवितागिर्‍हाईकाकडेलक्षच देतनाही. माझ्यामते अनेककवी त्यांचेआत्यंतिकनिष्ठावंतवाचक, वज्यांचा अजूनजन्मच झालेलानाही, अशांनासोडून बाकीसर्वांचाद्वेष करतात. बहुधात्यांची मदारभविष्यातीलसैद्धांतिकम[...]फार(च) झाले

Mon, 25 Jun 2012 09:17:00 +0000


धोंडोपंत आपटे यांच्या फेसबुकवरील  सुंदर गजलेच्या केशवसुमारांनी मनोगतावर केलेल्या गंभीर विडंबनाचे खोडसाळ विडंबन.

आज भर दिवसात म्हणजे फार झाले
प्रेम ना काबूत म्हणजे फार झाले

कोण दिसली हे असे स्वारीस ठाउक
मागुनी जातात म्हणजे फार झाले

नाहती कांता कधी होणार आता
मोजती वर्षांत म्हणजे फार झाले

दुष्ट हे सारे जरी नवरे तरीही
झिंगुनी येतात म्हणजे फार झाले

बसमध्ये आहे जरी गर्दी तरीही
झोंबुनी घेतात म्हणजे फार झाले

बोलण्याची स्पष्ट हे नाही मुभा पण
रात्रभर छळतात म्हणजे फार झाले

लाज तर काढेल ती दुनियेसमोरी
चोप भर रस्त्यात म्हणजे फार झाले

वेष तव पाहून होतो पेटलेला
मोजशी पोरात म्हणजे फार झाले

काव्य ते पाहून "खोड्या" पेटलेला
तो कवी तोर्‍यात म्हणजे फार झालेइतनी मुष्किल नहीं किताबत (द्विभाषिक विडंबन)

Sun, 10 Jun 2012 12:54:00 +0000

प्रेरणास्रोत : निशिकांत यांची द्विभाषिक गझल "रूखी, सूखी, बासी दावत"

टिचभर गझला लिहिण्यासाठी रोज कशाला हवी कवायत?
खून पसीना छोडो, भैया, इतनी मुष्किल नहीं किताबत

पहा दीन वाचकांस देतो तत्परतेने गझल द्विभाषिक
सवाल मेरा आज कवी से, "गयी तुम्हारी कहाँ रिवायत?" 

शेर सांगता दुसर्‍यांना आनंदित होतो कवी परंतू
कहनेवालें यहाँ हज़ारों, सुननेवाला मिले, गनीमत

दिवे लागले, अतिथी गेले, तूच उबारा माझा आता
सोनेसे जागना है बेहतर, तनहाईमें करें शरारत

मला न चिंता, न काळजीही, ज़नानखान्यामध्ये सुखी मी
सवाल मुझको है सिर्फ़ इतना, बनाम किसके करूँ मुहब्बत

अंधाराच्या किश्श्यांवरती आत्मवृत्त लिहिण्याला बसलो
माहताब शरमाकर बोली, "बेग़ैरत हो, मियाँ, निहायत"

अलिबाबाच्या गुहेत होत्या तिघी, संपदा, माणिक, नीलम
याद आ गयी मुझको भी किस वख़्त मगर कंबख़्त शराफत

लग्नावरती आज भरवसा कसा, कुणी अन्‌ किती करावा?
निकाह फर्ज़ी, फर्ज़ी काज़ी, गले पड गयी मेह्र  की आफत

दोषपूर्ण गझलांच्या "खोड्या" काढत  केले लेखन सारे
अर्ज़ मेरी है यही खुदासे, रहे सुखनवर सभी सलामतवाचकांची बोंबाबोंब (आणि शिव्या :) ) टाळण्यासाठी उर्दू शब्दांचे अर्थ खाली देत आहे.

किताबत - लेखन
रिवायत - परंपरा
गनीमत - पर्याप्त
शरारत - खोडसाळपणा, खोड्या
बेग़ैरत - निर्लज्ज
शराफ़त - सभ्यता
आफ़त - संकट
सुखनवर - कवी
सलामत - सुरक्षित चूक होती

Sat, 05 May 2012 16:12:00 +0000

आमचा प्रेरणास्रोत : जयन्ता५२ ह्यांची वाचनीय गझल "भूक होती"


पोटात माझ्या चूक होती
अवस्था किती नाजूक होती

पुसतात मग तोंडास पाने
जी माणसे कामूक होती

कित्येक दिसले हासताना
ती पोरगी चाबूक होती

मग सोडले उपवास त्याने
काया तिची साजूक होती

नाते कधी ना जोडतो पण
श्वशुराकडे बंदूक होती :(

गरतीस मी भेटून आलो
मर्जी तिची ठाऊक होती


(लाभली नाही कधीही)

Tue, 28 Jun 2011 10:15:00 +0000

प्रेरणा : मिलिंद फणसे ह्यांची गझल "लाभली नाही कधीही"

लाभली नाही कधीही स्वस्थता त्याच्या जिवाला
आस जो रोमॅन्सची घेउन उभा लग्नास झाला

काल वर, खाली उद्या हे बायकोचे प्रेम लहरी
आज माहेरी पळाली यौवनी घालून घाला

दंशही झाकून असतो अन्‌ नखांची खूणही मी
हो, फुकट कार्यालयी ते पाहुनी थट्टा कशाला ?

सर्व शस्त्रांहून भीतो टीचभर त्या बायकोला
चढवली साक्षात मी रणचंडिका पत्नीपदाला

गालिचे, गाद्या, उश्या अन्‌ चादरी कंटाळलेल्या
बायको माडीवरी ज्ञानेश्वरी घेते उशाला (image)

प्रेमवीरांनी शिकावे खोडसाळापासुनी की
तारखांची चूक नेते ओढुनी त्या बोहल्यालासऽरंगा तेरी याद में जीभ हुई बेचैन

Sun, 15 May 2011 13:44:00 +0000

मूळ गाणे : "सारंगा तेरी याद में"
http://youtu.be/8BZt0l8VzH4हे ऐकून डोक्यातील किडा वळवळू लागला, व खालील ओळी सुचल्या. 

सऽरंगा तेरी याद में जीभ हुई बेचैन
तीखे तुम्हारे स्वाद बिना
दिन कटते नहीं रैन, हो~
सऽरंगा तेरी याद में ...

वो इमली का घोल और हलदी, मिरची, तेल
कैसी खुशबू देता था अद्रक-लसन मेल
आज किधर को खो गयी
वो मछली की गैल, हो ...
सऽरंगा तेरी याद में ...

संग कबाब-ओ-तंदुरी, बीअर के दो घूँट
होते थे मेरे सामने. पडता था मैं टूट
सुख लेके दुख दे गयीं
क्यों, धीवरी, तू रूठ ? ...
सऽरंगा तेरी याद में ...

सऽरंगा तेरी याद में जीभ हुई बेचैन
तीखे तुम्हारे स्वाद बिना दिन कटते नहीं रैन

अब घर के रसोई में चलत बिरहा समीर
बाट तकूँ तेरी, सऽरंगा, आँखों में है नीरशस्त्रे

Tue, 10 May 2011 07:02:00 +0000

आमची प्रेरणा : प्रदीप कुलकर्णी ह्यांची गझल "वस्त्रे"


लेखणी परजून आलो तुजसवे आता पुन्हा !
ये जरा मोडू तुझे गाणे नवे आता पुन्हा !

आज मी आलो जरा जोशात आणिक नेमके
दार शेजारी अवेळी ठोठवे आता पुन्हा !

कोण नक्की पाहिजे ते येत नाही सांगता
देखणे कोणीतरी पण मज हवे आता पुन्हा !

मी सुखाचा एक मोका घेतला केव्हातरी...
आठवी तो चोप अन्‌ ते काजवे आता पुन्हा !

पान सोडा, देठही उरले न हिरवे एकही...
का तरी दिसता थवे मज खवखवे आता पुन्हा ?

दूर दे फेकून शस्त्रे वक्र-उक्तीची जरा...
रुष्टले, खोड्या, पहा कविपुंगवे आता पुन्हा !कळ्यांच्या बोलण्याने लाजले दव

Sat, 19 Mar 2011 05:28:00 +0000

प्रेरणा :  कळ्यांना जागवूनी बोलले दव

कळ्यांच्या बोलण्याने लाजले दव
"पुरे दो-चार घटकांचेच शैशव"

प्रिये, कंठात कोकिळ-स्वर असावा
पहाटे का तुझा हा कर्कशारव ?

अता कटवावयाची वेळ झाली
सख्याच्या मागण्या हल्ली अवास्तव

मधाचे बोट दिधले, खूप झाले
उधारीवर हवे मेल्यास अर्णव!

दवाला स्पर्श अन्‌ चुंबन अलीला
नि तिसर्‍याशीच चाले नेत्रपल्लव

ढगळ पोषाख घालुन स्थूल झाकी
स्वत:चे धष्ट आणिक पुष्ट सौष्ठव

जराही ना चुकवता कर्ज बुडणे 
असे याहून काही खाद्यलाघव?

किती, रे, खोडसाळा, दांडगाई
कवन दिसताक्षणी हातास खवखव...         (कधी तूही कवी होतास, आठव)
------------------------------------------------------------------------------
ता. क.
अरे भुंग्या, मराठी शीक थोडी
किती भाषा तुझी, रे, संस्कृतोद्भव ?

गमे मज कवन तव गीर्वाणकर्दम
इत: तत्सम, तत: तव शब्द तद्भव   (image)(पोच)

Sun, 24 Oct 2010 12:12:00 +0000

प्रेरणा : "पोच"

वाचण्याचा त्रासही घेतोच आहे
अन्‌ तुझे वाचूनही जगतोच आहे

दीप विझले सर्व खोलीतील, सखये
अंतरे का घन तमी? मी 'घो'च आहे

चुंबनाचा नूर काही और आहे
हाय, अधरांच्या ठिकाणी चोच आहे!

का तुझ्या नजरेत ओळखही नसावी ?
नासिकेवर जाड चष्मा तोच आहे

गारुडी कित्याक आले आणि गेले?
मल्लिकेचा "हिस्स" तर पडतोच आहे

शेवटी शृंगारही गपगार झाला
केवढा वातानुकूलित कोच आहे!

केवढी शृंगारली कविता कवीने
खोडसाळाला कुठे पण पोच आहे ?(वाटतो जरी प्रसन्न मी वरुन)

Sun, 17 Oct 2010 02:43:00 +0000

डॉ.कैलास गायकवाड यांच्या "वाटतो जरी प्रसन्न मी वरुन" या गझलेने प्रेरित होऊन...

वाटतो जरी प्रसन्न मी वरुन,
दु:ख साचलेय आयकर भरुन

झाकले उघड कसे करायचे?
"सीनची गरज" असे जगा म्हणुन !

पाहिली असंख्य सौख्यसाधने
मी घरी बसून दुर्बिणीमधुन   (image)

धूम्र वात सोडतो उरातले
नि तसाच खोकतो पुन्हा भरुन

ढोसणेच ज्ञात जाहले मला
जीवनात तर्र मी असे पिउन

डास चावले.......... मलेरियासवे
घाम का फुटे उगाच दरदरुन?

लग्न-ताप काय जाणल्यावरी
दु:ख जाहले मुलास "हो" म्हणुन

बाळ व्हायची अवेळ जाहली
खूप पाहिले स्वत:स आवरुन 

--खोडसाळ(बेफिकीर)

Wed, 13 Oct 2010 11:27:00 +0000

प्रेरणा : डॉ. कैलास गायकवाड यांची कसीदासदृश रचना 'बेफिकीर'.

कधी न करितो उशीर तू; बेफिकीर मित्रा ?
कसे म्हणावे अम्ही तुला वक्तशीर मित्रा ?

तुझे कवाफ़ीत संपले तास चार आता 
कशास त्यावर अलामतीची जिकीर मित्रा ?

तुझी गझल वा तुझी द्विपदी किती अवास्तव
कशास माबोवरील केले शिबीर मित्रा ?

सुडौल पुरुषात, सांग, गणना कशी करावी ?
तुपास खाऊन देह करितो फुगीर मित्रा

गुमान काढून ठेवले जात काप ज्याचे
असा मटण-कोंबडीतला तू पनीर मित्रा

तुझे नि माझे घनिष्ट नाते विडंबनाचे
कशास "खोड्या" जगी असेस्तव फिकीर मित्रा ?घुसल्या घरात माझ्या

Mon, 11 Oct 2010 06:53:00 +0000

प्रेरणा : "गजला घरात माझ्या"

गझला पुराप्रमाणे घुसल्या घरात माझ्या
पडला उजेड नसता; कानात वात माझ्या

कानास छेदणार्‍या बारा बघून गझला
त्यांनी मला विनविले गाण्या मनात माझ्या

उद्रेक वाचकांचा होताच त्या क्षणाला
'कंडम' म्हणून गझला नाकारतात माझ्या

रोटीसवे कलेजी खातात दोस्त जेव्हा
का वाढतेस पानी तू दूध-भात माझ्या

मुजरा बघावयाला जाणे पसंत नाही
आणेन नर्तकींना मी हापिसात माझ्या

गझलेमुळे पळाल्या कित्येक प्रेमिका मम
हातावरी तुरी त्या का ठेवतात माझ्या ?

निष्प्राण जीव झाला, झाले अचेत श्रोते
गझला म्हणीत होते बहुधा ज्वरात माझ्या

का? का? असा मुलींचा लागून ध्यास आहे ?
दुसरी घरात आहे, पहिली क्लबात माझ्या

आले उधाण मजला तेव्हा कुणी म्हणाले
का त्याच त्याच गझला रुतल्या घशात माझ्या ?

गझला कशा लिहाव्या सांगेल कोण ठरवा ?
निघतील खास गझला अवसायनात माझ्या

ही "खोडसाळ" आहे इच्छा, मिळोत गझला
बघताक्षणी विडंबन फुलु दे मनात माझ्या(अंतरातली व्यथा अंतरी जपायची)

Sat, 25 Sep 2010 10:17:00 +0000

प्रेरणेचा स्रोत : मिल्याची मस्त गझल "अंतरातली व्यथा अंतरी जपायची"

भेट आपली अशी 'वाद'ळी असायची
आत, बाह्य अंगभर...खोल जखम व्हायची

भार केव्हढा तुझा ... श्वास चोंदवीलसा 
देह कोसळायचा अन मिठी सुटायची

भांडण्यास तू मला... मी तुला असायचो
रात्रभर तुझ्यामधे झांटिपी शिरायची

ह्या तिच्या जुन्या त्रुटी... रोज स्नान टाळते
श्वास रोख! अन्यथा... नासिका जळायची

दाखवू नकोस तू सौष्ठवास सारखे
प्रेरणा मिळायची... 'काम'ना करायची

दिवस पाहिले असे... की खरे लिहायचे
सलिल मास्तरासही चाल मग सुचायची

एक नीळकंठ तर पार्वती, सतीमधे
दोन बायकांतली मत्सरी जपायची

मी अखेर जाणले मर्म यौवना तुझे
लक्ष्य ओळखायचे... सावजे टिपायची

एक हेच साकडे खोडसाळ घातले
सोड शेवटी तरी लालसा लिहायचीउतारे

Wed, 08 Sep 2010 19:35:00 +0000

मी बोललो न काही, तू बोलतेस सारे
ह्यालाच नवयुगाचे म्हणतात काय वारे ?

विसरू कसा, प्रिये, मी मधुचंद्र आपला तो
येतो अजून काटा, येती किती शहारे

वाटायचे, करावे तू गप्प चुंबनांनी
तू ऐकवीत बसली गीतेतले उतारे

चाले सरस्वतीचे नर्तन तुझ्या जिभेवर
अन् शब्द संपल्यावर नुसतेच हातवारे

मी नेत्रपल्लवीने 'विषया'स छेडल्यावर
बघसी वटारुनी तू संतप्त नेत्र घारे

पाणी दुज्या तळ्यांचे चाखवयास जावे
तर ठेवतेस कायम माझ्यावरी पहारे

दिसतील काय, देवा, मजला दिवस असेही
'खोड्या' तिच्या 'अरे'ला जेव्हा करेल 'का रे' ?(ठिगळ)

Wed, 11 Aug 2010 10:14:00 +0000

प्रेरणेचे उगमस्थान : मिलिंद फणसे यांची गज़ल "ठिगळ"

इतके कुणी कुणाच्या जावे जवळ कशाला
लगटून झोंबण्याला कारण सबळ कशाला

चोरून पाहण्याची संधी पुन्हा उद्याही
की-होल शोधण्याची ही धावपळ कशाला

खड्ड्यात चाक रुतणे चुकते इथे कुणाला
प्रारब्ध पावसाळी ठरते अटळ कशाला

सारी पिऊन झाली, उरली न औषधाला
मी अन्यथा कुणाशी बोलू बरळ कशाला

पत्नी-समीप सारे असतात रोज राती
मी एकटाच राहू आईजवळ कशाला

कोणी लिहोत काही, बसणार स्वस्थ आता
दिसताच काव्य, खोड्या, ढवळाढवळ कशाला(अखेर!)

Mon, 09 Aug 2010 07:25:00 +0000

आमची प्रेरणा : प्रदीप कुलकर्णी यांची गजल अखेर!

........................................
(अखेर!)
........................................

हात आताशा तुला आलो कुठे लावून मी?
क्लांत झालो शेवटी नुसताच न्याहाळून मी!

कोण जाणे झापते का सारखी पत्नी मला
दाखवावे शौर्य; अंधारात वेडावून मी!

बांधुनी ठेवायचे पदरी असे त्याला किती?
...दावणीला ठेवला मग दादला बांधून मी!

खायचे किंवा कसे; ठरवायचे आहेस तू...
ठेवले आहे शिळे तुज कालचे वाढून मी!

ओळखू येती न आता गाल माझेही मला
घेतले आहे किती रस्त्यात थोबाडून मी!

आणतो जोशात प्राणी एवढासा कंद हा
पाहिल्या कंदर्पपाकाच्या वड्या खाऊन मी!

वारसा माझा पुढे नेला कुणी हा? कोण हा?
वाचतो आहे असा कोणास कंटाळून मी?

राहिला नाही कवीचा अर्थ आता एकही...
शब्द त्याचे टाकले आहेत उलथावून मी!

एवढेही भक्ष कोणीही मला देऊ नये...
लेखना टाकीन सार्‍यांच्याच फस्तावून मी!

- खोडसाळ
................................................
पुनर्रचनाकाल : ८ ऑगस्ट २०१०
................................................माबो, मिपा, मनोगताचा दोष असावा

Sat, 07 Aug 2010 04:46:00 +0000

प्रेरणा : आमचे परम-मित्र काव्यानिरुद्ध तथा अनिरुद्ध१९६९ ह्यांची गज़ल "हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा" .

माबो, मिपा, मनोगताचा दोष असावा 
शब्दस्फितीचा भस्मासुर इतका वाढावा ?

कधीतरी हातांची भाषा मला कळावी
कधीतरी मुस्कटातला लाफा उमजावा

भात-वरण ह्या दोन वितीच्या पोटी मणभर
भरल्यावर आमांश कसा सांगा चुकवावा ?

युगे बदलली काळ बदलला कार्तिकस्वामी
एक आयडी शादी डॉट कॉमवर उघडावा

किती खोल मी अजून जावे कर्णी माझ्या
कधीतरी मळ मला अता हाती लागावा

उगाच चर्चा मी तेव्हा केली पत्नीशी
"चुकले तुमचे", रोजचाच निष्कर्ष निघावा

अता एकदा संपावी काव्याची दैना
खोडसाळ हा शब्दांचा दंगा थांबावाकोणत्या नाक्यावरी त्याला धरू ?

Sun, 18 Jul 2010 17:42:00 +0000

आमचे प्रेरणास्थान : चित्त यांची अप्रतिम गझल "कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?"

कोणत्या नाक्यावरी त्याला धरू ?
हिंडते गल्लीत जे फुलपाखरू

तू अता बघशील वाता - हत खरी
लागले पाणी-पुरीने डरडरू

गायही तेव्हाच गोठा सोडते
लांबुनी जर बैल लागे हंबरू

खुणवती सार्‍या पुरातन 'ओळखी'
पाहुनी लागे नवी ही कुरकुरू

सुळसुळाया लागली झुरळे किती !
केवढी दिसतात, चल कल्ला करू

चालवू माझे विडंबन - हल किती ?
केवढे लिहितात हे कविकुलगुरू

---------कलम १ -----------------

खूप पल्लेदार आहे माल पण
वाचताना श्वास लागे घरघरू

आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिशी कापू, जरा वस्त्रा धरू

ढापण्यांनी रूप आहे देखले
यंग कुठले सांग आहे पाखरू ?

ओठ, बांधा, केस, बाहू अन्‌ कटी
(हे धरू की ते धरू की ते धरू)


१. मराठीत किंवा - नाही, फक्त मराठीतच - विडंबकाला एखादे विडंबन (कितीही ओळींचे) करायचे असते तेव्हा त्या ओळींच्या वर किंवा मध्ये किंवा दोन ओळींच्या मधल्या मोकळ्या जागेत किंवा जिथे जागा मिळेल तिथे (image)   हे चिन्ह ठेवून खालील ओळी ह्या विनोदी समजाव्यात, असा विडंबक निर्देश करतो. मराठी विडंबनात ही पद्धत न राबवल्यास विडंबकाची लेखणी कलम केली जात असल्यामुळे मला कलम हा शब्द किंवा क हे अक्षर प्रस्तुत वाटते. कलम ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा करणे किंवा पाडणे. आणि दुसरा अर्थ परिच्छेद किंवा विशिष्ट आयटम ('तसला' आयटम नाही हो!) असाही आहे.  (ह्याबाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल मी उर्दू-फारशीचे माझे जाणकार मित्र श्री. चित्त ह्यांचा अत्यंत आभारी आहे. )     (माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे)

Sun, 18 Jul 2010 06:20:00 +0000

प्रेरणा : जयन्ता५२ यांची गझल "माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे"

माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे
सांगू नये जगाला, चुपचाप निस्तरावे

पंचांग म्हणत कुठले की आजची अमावस ?
'दाते' न 'कालनिर्णय', बहुधा 'टिळक' असावे

आडून चौकशी का होते जनांकडूनी
इतक्यात सर्व लफडे त्यांच्या पुढ्यात यावे ?

अफवा कशा पसरल्या गावात जाणतो मी
बघुनी मुले तुझे ते रेंगाळणे असावे

माझ्याच बायकोची ही काय राजनीती ?
सोडून कक्ष माझा मजलाच घालवावे

"माझ्याच कुंकवाची ही काय कार्यरीती ?
संघात दक्ष आणिक कक्षात सुस्त व्हावे"

-----------------------------------

खोडसाळ(आज अचानक तुझी आठवण का यावी)

Fri, 16 Jul 2010 19:10:00 +0000

आमची प्रेरणा : अनिरुद्ध१९६९ यांची सुंदर गझल "आज अचानक तुझी आठवण का यावी"

आज अचानक तुझी आठवण का यावी
विजार सारी ओली माझी का व्हावी ?

भात, डाळ या गोष्टी का झाल्या नाही
पुर्‍या लाटल्या असतील, चटणी वाटावी

जुन्या वहीची पीत वेष्टनातिल पाने
अकस्मात पत्नीने येउन उघडावी

बरेच काही घडले ह्या मधल्या काळी
तुझी निशाणी जगा कशी मी दावावी ?

अर्थ उतरण्या शब्दांमध्ये घाबरले
भीती इतकी कवड्याची का वाटावी ?

तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
किती मुक्याने परंतु कटकट सोसावी ?

हिशोब केला तुवा दिलेल्या पोरांचा
समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी

पुन्हा तोच तो ऊस उगावा कवितेचा
पुन्हा त्याच चरकातुन यमके काढावी

गझल पाडणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते तुला उपरतीही व्हावी

मनात आहे खोडसाळ दडला माझ्या
आज उडी अनिरुद्ध कवींवर मारावी